द ग्रेट खली यांचे शिष्य काली भैय्या उर्फ उत्तम भंडारी लऊळ येथे सत्कारीत
माजलगाव / प्रतिनिधी WWF या अमेरिकेतील लोकप्रिय खेळप्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू द ग्रेट खली यांचे शिष्य तसेच CWE या उपशाखेतील महाराष्ट्रामध्ये पहिला व देशात दुसरा क्रमांक पटकावणारा कालिशेठ उर्फ फकीर उत्तम भंडारी मु. पो. सुरळेगाव, ता, गेवराई, जिल्हा बीड यांनी आपला पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय करत त्यानी हे यशाचे शिखर गाठले असून समाजासाठी हे एक भूषण आहे. त्याने जिद्द आणि परिश्रमाने यशाला गवसनी घातली म्हणून त्याचा समाजाच्या वतीने व जय हनुमान भुजल मत्स व्यवसाय सहकारी संस्था लऊळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळेस संस्थेचे चेअरमन गणेश परसे, सचिव विश्वनाथ कुंडरे, दशरथ कुंडरे, , गणेश लुचारे, विठ्ठल इंद्रके, विलास धनुरे, ज्ञानेश्वर कुंडरे, संतोष कचरे, खंडू गिरुटे, राजू घुंगासे, राधाकिसन पठाडे, नवनाथ घुंगासे ग्लोबल कार समाज चारीटेबल ट्रस्ट चे जिल्हा अध्यक्ष रामदास यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.