सातेफळ येथील महाविद्यालयीन तरुणीचा विषारी सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यु

सातेफळ येथील महाविद्यालयीन तरुणीचा विषारी सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यु
केज: तालुक्यातील सातेफळ मध्ये एका ऊसतोड मजुराच्या महाविद्यालयीन मुलीचा विषारी सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे .
या बाबतची माहिती अशी की , सातेफळ ता . केज येथील उसतोड मजुर रामेश्वर साळुंके यांची मुलगी कु . पायल रामेश्वर साळुंके ही कळंब येथील महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत होती . कु . पायल साळुंके ही दि . ९ जून गुरुवार रोजी दुपारी ४:०० च्या दरम्यान घरी झोपलेली असताना तिच्या डाव्या पायाच्या बोटाला आणि टाचेच्या शिराजवळ विषारी सापाने चावा घेतला . तिला उपचारासाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल करून उपचार सुरू होते . मात्र दि . १० जून शुक्रवार रोजी तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला . तिच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .