सामाजिक समतेचा गौरव – राज्य कार्याध्यक्ष – प्रा. दशरथ रोडे
सामाजिक समतेचा गौरव – राज्य कार्याध्यक्ष – प्रा. दशरथ रोडे
अंबाजोगाई / ( पृथ्वीराज निर्मळ )
येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ अंतर्गत बीड जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेप ( प्रिंस ) यांनी राजश्री शाहू महाराज यांची २६ जून २०२२ रोजी जयंती साजरी करण्यासाठी तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या संदर्भात १८ जून २०२२ शनिवार रोजी सायंकाळी ठिक ६- ०० वा. शासकीय विश्रामगृहात येथे बैठक संपन्न झाली.
अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्यातीने अंबाजोगाई येथे राजर्षी शाहू महाराज यांची २६ जून २०२२ रोजी जयंती साजरी करण्यात येणार आहे. सामाजिक शैक्षणिक, पत्रकारितामध्ये ज्यांनी संपूर्ण आयुष्य भर महापुरुषांच्या विचारांची जनजागृती केली. तसेच बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात महापुरुषांच्या विचारावर सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारितेमध्ये कार्य केले बद्दल त्यांचा या कार्यक्रमात गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
संघाचे अध्यक्ष मा. सुर्यवंशी यांच्या आदेशावरून संपुर्ण देशात तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. विजयकुमार वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध कार्यक्रम सुरू आहे . बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांची नावे, कार्य, सविस्तर माहिती त्वरित बीड, गेवराई ,आष्टी, वडवणी, माजलगाव, परळी , अंबाजोगाई , संबंधित तालुकाध्यक्षकडे देण्यात येवे .अशी सुचना देण्यात आली. त्यानंतर समितीच्यावतीने त्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.
असेही या बैठकीत चर्चा झाली. बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेप आणि अंबाजोगाई
शाखेच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावीत असे या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात प्रथमच राजर्षी शाहू महाराज जयंती बीड जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेटे प्रिंस यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकीला राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, राज्य संघटक, भागवत वैद्य. जिल्हाध्यक्ष तालेब, सौ. सुनंदा केदार, मराठवाडा उपाध्यक्ष, पाटेकर. स.का. मराठवाडा उपाध्यक्ष सुहास सावंत, माजलगाव तालुकाध्यक्ष अमर साळवे , अनिल डोंगरे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अहमद पठाण, अजय गोरे, प्रसेनजित आचार्य, शेख सय्यद, परळी तालुकाध्यक्ष अमोल सुर्यवंशी , अंबाजोगाई शाखा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.