वसंतराव नाईक यांचे शेतीविषयक अनमोल योगदान – राम कटारे
माजलगाव/प्रतिनिधी, माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथील नाईक पब्लिक स्कूलमध्ये हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची १०९ व्या जंयती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेचे संचालक मा. ज्ञानेश्वर पवार व शाळेचे मुख्याध्यापक मा. परमेश्वर आळणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन राम कटारे यांनी केले ते बोलताना असे म्हणाले की महाराष्ट्रातील हरित क्रांतीची सुरूवात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते, कृषीतंज्ञ होते शेती आणि मातीवर निस्सीम भक्ती होती, भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते, यामुळेच शानिवारवाडा येथील जाहीर सभेत ते बोलताना म्हणाले की जर दोन वर्षेात राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयपुर्ण केले नाहीत तर मी जाहीर सभेत फाशी घेईल अशी भिष्मप्रतिज्ञा केली.
महाराष्ट्र १९७२ एवढा दुष्काळ कधीही पडला नव्हता अशा भिषन दुष्काळावर ही वसंतराव नाईक यांनी मात दिली, शेतकरी सुजलाम -सुफलाम होण्यासाठी शेती कसण्यासाठी अधुनिक अवजारे, उत्तम बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषध मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांना कमी कितीतरी उपलब्ध करून देणे यामुळे गहु बाजरी, ज्वारी, मका हे हरित, हिरवी पिके मोठ्या प्रमाणावर येतील व शेतकरी वर्ग दिवसेंदिवस प्रगती करेल तेव्हा नक्की हरित क्रांती होईल असे वसंतराव नाईक यांचे शेतीविषयक अनमोल योगदान होते असे बोलताना राम कटारे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. दिलीप लबासे यांनी केले, अभार प्रदर्शन मा. मुकुंद शिंदे यांनी केले. यावेळी उपस्थित शाळेचे संचालक मा. ज्ञानेश्वर पवार, मा. जीवन राठोड, शाळेचे मुख्याध्यापक मा. परमेश्वर आळणे, मा. दिलीप लबासे, मा. राम कटारे, मा.मुकुंद शिंदे, मा. खुने सर, सिमा राऊत, दिव्या मॅडम, घाटुळ मॅडम सह शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.