Welcome to Vartman Maharashtra News!

कला आणि क्रीडा

Bhagwani Devi : 94 वर्षांच्या आजीबाईंची कमाल, वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅंम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकासह कांस्य पदकावर कोरलं नाव

World Masters Athletics Championship : ‘Age is Just Number’ या इंग्रंजी वाक्याचा प्रत्यय कधी कधी सत्यात येतो, हाच प्रत्यय हरियाणाच्या 94 वर्षीय भगवानी देवी यांनी आणून दिला आहे. या आजीबाईंनी “फिनलँडच्या टेम्परे येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅंम्पियनशिपमध्ये (World Masters Athletics Championship) सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांना गवसणी घातली आहे. ज्या वयात अनेकांना चालायलाही अवघड पडतं अशामध्ये भगवानी देवी यांनी 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. तर शॉटपुट खेळात कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.

Related Articles

Back to top button