
रोहित वगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श उपक्रम
माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
तालुक्यातील सोन्नाथडी येथील युवा नेतृत्व रोहित वगरे यांच्या वाढदिवसानिमित्त खाजगी कार्यक्रमांचा आनावश्यक खर्च टाळून सोन्नाथडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विध्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून विध्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्य, पाण्याच्या बॉटल, पेन, वही, पुस्तके अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सोन्नाथडी गावाच्या परिसरामध्ये व येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध झाडांचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना वगरे म्हणाले कि, यापुढे हि असेच सामाजिक कार्य करण्यात व ग्रामस्थांची मदत करण्यास ते नेहमी तत्पर व अग्रेसर राहतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी मा.प.स.सदस्य केरबा पराड, ज्ञानेश्वर काटकर, रामेश्वर शिंदे, शंकर शिंदे, समाधान व्हरकटे, समाधान देवकते, परमेश्वर शिंदे, राम शिंदे, गोकुळ शिंदे, शिवाजी माने हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक संतोष गांजोरे यांनी तर आभार खेत्री गुरुजींनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान काटकर व मित्र मंडळींनी अथक परिश्रम घेतले.