Welcome to Vartman Maharashtra News!

अवस्था आणि व्यवस्थाशैक्षणिक

आडस येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक कार्यकत्या सविताताई आकुसकर यांचे आमरण उपोषण.

केज तालुक्यातल्या आडस गावातील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक कार्यकत्या सविता ताई आकुसकर यांचे आमरण उपोषण.आडस जिल्हा परिषद शाळेला स्वातंत्र्य कंपाऊंड देण्यात यावे आडस जिल्हा परिषद शाळेला सेवक देण्यात यावा . जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता व नवीन इमारत बांधकाम तात्काळ करण्यात यावे .आडस जिल्हा परिषद शाळा हे घाणीचे साम्राज्य बनले आहे. आडस जिल्हा परिषद शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसविण्यात यावे जेणेकरून आडस गावातील ग्रामस्थ व इतर लोक त्या ठिकाणी संडास मुतारी साठी जाऊ नयेत अशाप्रकारे जर चालू राहिले तर विद्यार्थ्यांना असंख्य आजारांना बळी पडण्यावे लागेल. वारंवार निवेदन देऊन प्रशासनाने कुठल्याही प्रकारे सविता ताई आकुसकर यांच्या निवेदनाचे कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही 75व्या अमृत महोत्सव निमित्त तरी बीड जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेब यांनी तात्काळ या उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा आडस गाव चे ग्रामस्थ रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. सन 2013 ते 2022 पर्यंत वारंवार निवेदन देऊन प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे .प्रशासन याकडे लक्ष तरी केव्हा देणार आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे जर दुर्लक्ष बीड जिल्ह्यातील आडस जिल्हा परिषद शाळेवर बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता उपोषणकर्त्यांना वेळोवेळी सहकार्य करून तो प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता परंतु आज 2013 ते 2022 नव वर्ष जर सामाजिक कार्यकर्त्यांना वारंवार निवेदन देऊन जर त्या गोष्टीला न्याय मिळत नसेल तर लोकशाही चालवणारे अधिकारी व प्रशासन यांनी कशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्याशी वागले पाहिजे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे जर हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचला नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना उपोषण व सामाजिक कार्यकर्ता याचा असण्याचा भाग राहणार नाही सामाजिक कार्यकर्ता हा कुठल्याही जातीचा व कुठल्याही धर्माचा नसतो तो फक्त समाजाची दशा आणि दिशा ठरवण्यासाठी समाजाने त्या माणसाला त्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे केलेले आसते जर प्रशासन त्या माणसाचं व त्या सामाजिक कार्यकर्तेच प्रश्न जर मार्गी लागत नसतील तर याबद्दल प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिक यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जागरूक प्रशासनाची झालं पाहिजे प्रशासनाने जर नव वर्षात निवेदनावर निवेदन देण्याची वेळ जर सामाजिक कार्यकर्त्यावर येत असेल तर प्रशासन काय करत आहात हा प्रश्न सर्वसामान्य पर्यंत पोहोचायला हवा राजकीय दबावपोटी जर असे प्रकार घडत असतील तर सोशल मीडिया व्हाट्सअप फेसबुक ट्विटर असंख्या मेडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले सामाजिक कार्यकर्ता कुठपर्यंत पोहोचणार आहे हा सुद्धा विचार प्रश्न उपस्थित होत आहे जर सामाजिक कार्यकर्त्यांना गावगाड्यातील सर्वसामान्य नागरिकाच्या समस्या घेऊन उपोषण करावे लागत असेल तर 75 व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खरंच स्वातंत्र्य मिळाले आहे का हा प्रश्न भारत देशातील देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा आडस गावच्या ग्राम ग्रामस्थांचे आहे आडस जिल्हा परिषद शासकीय जिल्हा परिषद शाळेसमोर जर 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आमरण उपोषणाला बसण्याची वेळ जर ग्रामस्थानावर येत आसेल येत असेल तर खरंच स्वातंत्र्य मिळाले आहे .का हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

Back to top button