Welcome to Vartman Maharashtra News!

मनोरंजनवर्तमान महाराष्ट्र

रोटरी क्लब आपल्या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपते – कवी नारायण सुमंत

नारायण सुमंत यांच्या आम्ही आडनावाचे शेतकरी या कवितेने उपस्थितांच्या हास्याचे फवारे

रोटरी क्लब माजलगाव चा पदग्रहण सोहळा दिमाखात पार पडला

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )रोटरी क्लब हि जागतिक संस्था आपल्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपते. कोरोनाच्या काळात माझ्यासारख्या खेडेगावातील कलाकाराला जो मानसिक आधार दिला तो खरोखरीच वाखाणण्यासारखा असल्याचे गौरवोद्द्गार प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी काढले. माजलगाव येथील रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी च्या पदग्रहण सोहळ्यात आपल्या काव्यरूपी संवादात ते बोलत होते. कवीवर्य सुमंत यांच्या काळ्या मातीवरील कवितेने आणि बारबाला वरील विडंबनाने श्रोते अंतर्मुख झाले, तर त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या आडनावाचे शेतकरी या कवितेने हास्याचे फवारे उडविले.

रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी २०२२/२३ च्या अध्यक्षा म्हणून डॉ.अर्चना पवार यांनी तर सचिव रो. म्हणून प्रसिद्ध कवयत्री रो.स्मिता लिंबगावकर यांनी पदभार स्वीकारला.कार्यक्रमाची सुरुवात अनोख्या पद्धतीने वृक्ष पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविक आणि मागील वर्षीच्या समाजोपयोगी कामाचा लेखा जोखा मावळते अध्यक्ष रो. डॉ. प्रशांत पाटील यांनी मांडला. नूतन अध्यक्षा रो. डॉ. अर्चना पवार यांनी प्रभावीपणे आपले मनोगत व्यक्त केले.महिला सबलीकरणावर यावर्षी भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात क्लबच्या मुखपत्र ‘दृष्टीक्षेप’ या रो. निरंजन वाघमारे यांनी संपादित केलेल्या अंकाचे विमोचन करण्यात आले.

पुढे कार्यक्रमावेळी पर्यावरण पूरक प्लास्टिक मुक्ती प्रकल्प राबवित उपस्थितांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले, तर जेष्ठ नागरिक संघाला २१ खुर्चीचे वितरण करण्यात आले.पदग्रहणास मार्गदर्शन करण्यासाठी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे उपप्रांतपाल रो. विश्वजीत ठोंबरे उपास्थित होते.

यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा म्हणून संगीता संदीकर यांनी तर सचिव म्हणून रेणुका लोढा यांनी पदभार स्वीकारला.यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, अतिरिक्त पोलीस निरीक्षक निशिगंधा खुळे, डॉ. रोहिणी थावरे, पंडितराव तिडके यांनी रोटरी चे सदस्यत्व स्वीकारले.कार्यक्रमाचे आयोजन रो. सुरेश भानप, रो. डॉ. सुशील लोढा व रो. डॉ. अर्चना मोरे यांनी तर ओघवते सूत्रसंचालन रो. दीपक देशमुख व रो.लता जोशी यांनी केले.

आभारप्रदर्शन नूतन सचिव रो. स्मिता लिंबगावकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी माजी आमदार मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, संस्कार भारती देवगिरी प्रांत मातृशक्ती प्रमुख स्नेहल पाठक, सिद्धेश्वर संकुलाचे अमरनाथ खुर्पे, प्रकाश दुगड, जेष्ठ नागरिक संघाचे गाजरे सर, गौरीताई देशमुख, उज्वलाताई होके, पत्रकार बांधव यांच्यासह असंख्य आमंत्रित पाहूणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले सुरुची भोजनानंतर या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button